SEO in Marathi? SEO म्हणजे काय ?

SEO in Marathi

SEO in Marathi

SEO म्हणजे “Search Engine Optimization”.

SEO हा शब्दसमूह Blogging शी संबंधित आहे. Blog म्हणजे आपण digital स्वरूपात केलेले काही लिखाण. हे लिखाण इंटरनेटद्वारे दूरच्या वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची प्रसिद्धी करणे जरुरी असते. ह्यालाच आपण अलीकडच्या भाषेत ब्लॉगची मार्केटिंग असे सुद्धा म्हणू शकतो. जेव्हा कुणी User त्यांचेसाठी जरुरी माहिती इंटरनेटवर शोधतो तेव्हा आपल्या ब्लॉग वरील SEO तंत्रामुळे त्यांना आपले लिखाण काही शीर्ष क्रमांकामध्ये दिसू शकते.

तर असे हे SEO in Marathi – Search Engine Optimization म्हणजे काय? हे समजून घेण्याअगोदर Search Engine म्हणजे काय हे बघूया.

What is Search engine?

Search Engine म्हणजे Google, Microsoft Bing, Yahoo आणि इतर अशा काही विशेष वेबसाइट की ज्यांचा उपयोग करून लोक (User) इतर वेबसाइटवरील संबंधित माहिती असलेली web pages शोधतात.

अशी आपल्याला हवी असलेली माहिती search करणेसाठी लोक (User) काहीतरी keyword, Search Engine (website) मध्ये लिहितात व Search वर क्लिक करतात. Search Engine त्या Keyword शी संबंधित माहिती इंटरनेट वर शोधून User ला उपयोगी ठरू शकणाऱ्या वेबसाईट आपल्या निकालात (Results) दाखवतो. Search Engine सुद्धा अशा चौकशींशी मिळते जुळते keywords, Userला दाखवतो.

SEO in Marathi

What is Keywords?

Keyword हे एक शब्द किंवा काही शब्दांचा एक असा समूह आहे कि ज्यांचा उपयोग वापरकर्ते (User) त्यांच्या विचारणेशी (Query) संबंधित सामग्री शोधण्यासाठी शोध इंजिनमध्ये (Search Engine) लिहितात (Type करतात).

अशा Keyword चा उपयोग करून ब्लॉग पोस्ट लिहिल्याने शोध इंजिनांना (Search Engine) तुमची वेबसाइट सुरुवातीच्या काही निकालांमध्ये दाखवण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे जेव्हा वापरकर्ते (User) त्या Keyword बद्दल माहिती शोधतात तेव्हा तुमची Website त्यांना ठळकपणे दिसते.

ह्यालाच Website त्या Keyword साठी Rank करणे असे सुद्धा म्हणता येईल. त्यामुळे तुमच्या वेबसाइटवरील विषयांशी संबंधित असलेले कीवर्ड शोधण्यासाठी कीवर्ड संशोधन -Keyword Research- कसे करावे हे जाणून घेणे सुद्धा आवश्यक ठरते.

व्यवस्थित SEO मुळे ह्या Keywords साठी तुम्ही लिहिलेली ब्लॉग पोस्ट ही सुरुवातीच्या काही निकालामध्ये (Top Search Results) दिसते. सोप्या भाषेत ज्यामुळे जेव्हा कुणी Search Engine मध्ये एखाद्या विषयाशी संबंधित माहिती शोधतो तेव्हा व्यवस्थित SEO मुळे आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ची visibility वाढते.

SEO in Marathi

Courtesy: Image by Diggity Marketing from Pixabay

Types of SEO

SEO ला खालील काही प्रकारात वर्गीकृत केले जाऊ शकते. ह्यातील काही चांगल्या प्रकारात मोडतात तर काही चुकीच्या मानल्या जातात. हे ज्याच्या त्याच्या विवेकावर अवलंबून आहे.

White Hat SEO

White Hat SEO techniques कालांतराने तुमच्या Website ची SEO Ranking सुधारण्यासाठी आणि ती optimize (Optimize म्हणजे To make as perfect, effective or functional as possible) करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. White Hat SEO, Search Engine मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात आणि तुमच्या ब्लॉगसाठी किंवा व्यवसायासाठी सकारात्मक परिणाम देतात.

ह्यामध्ये खालील काही गोष्टींचा समावेश होतो.

  • Creating high quality content
  • Sharing blog posts on social media
  • Making your site user friendly

Black Hat SEO

नावाप्रमाणेच ह्यामध्ये अशा काही युक्त्यांचा उपयोग केला जातो कि ज्यामुळे सर्च इंजिन अल्गोरिथम नुसार content लिहिले जाते किंवा त्यात लवकर Rank होण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम वापरल्या जातात. पण अशा युक्त्यांमुळे जरी नजीकच्या काळात लवकर परिणाम मिळत असले तरी दीर्घकाळात फायदा होत नाही.

ह्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

  • Link spamming: To manipulate search engine rankings by creating low-quality, irrelevant links
  • Keyword stuffing: Keywords कृत्रिम वाटतील असा खूप भरणा करणे; जेणेकरून Search Engine ला अशी Blog Post महत्वाची वाटावी.
  • Cloaking: हे एक असे तंत्र आहे ज्यात Search Engine ला एक URL, Page किंवा Post दाखवली जाते परंतु वास्तविक वापरकर्त्याला (User) दुसरीच कमी दर्जाची माहिती दाखवली जाते. चांगली वस्तू दाखवून कमी दर्जाची वस्तू विकणे अशा सारखे इथे काहीसे समजता येईल.
  • Copying content: हे साहित्य चोरीसारखेच काम आहे. स्वतः न लिहिता दुसऱ्या कोणाच्या तरी लिखाणाची हुबेहूब नक्कल करत स्वतःच्या ब्लॉग वर लिहिणे.

ह्यात अजूनही काही प्रकार आहेत; पण ते सगळेच माझ्या नजरेत Unethical आहेत. त्यामुळे ह्यावर जास्त चर्चा करण्याचा मोह टाळला आहे.

SEO in Marathi

Courtesy:: Image by Tumisu from Pixabay

On Page SEO

ह्यामध्ये content, internal links, URLs, headline, Tags, Images इत्यादीचा चांगला व परिणामकारक उपयोग केला जातो. परिणामी अशी माहिती SERP (Search Engine Results Pages) मध्ये लवकर Rank होते व अशा Post वर Visitors Traffic जास्त वेगाने येते.

मला सुरुवातीला On page SEO ची (आणि पूर्ण SEO ची सुद्धा) जास्त माहिती नव्हती. पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा On Page SEO साठी काही WordPress Plugin ची मदत होऊ शकते. ह्याबद्दल जास्त 8 Best On Page SEO Tools for WordPress इथे वाचता येईल. मी माझ्या ब्लॉग साठी RANKMATH हे Plugin (Basic version जे कि विनामूल्य आहे) वापरतो. आपली Blog Post लिहीतांना RankMath हे Plugin Blog Post मध्ये काय सुधारणा केल्यास अजून Score कसा वाढू शकतो ह्याचे मार्गदर्शन करते.

SERPROBOT सारख्या किंवा इतर अशा काही website वर आपण आपली Post कोणत्या Keyword साठी व कोणत्या क्रमांकावर Rank झाली हे तपासू शकतो.

Off Page SEO

Off Page SEO म्हणजे वेबसाइटच्या बाहेरील घटकांना (म्हणजे On Page SEO च्या गोष्टी वगळता ) अनुकूल करून वेबसाइटचे Search Engine Ranking मध्ये सुधारणा करण्याचा सराव आहे. ह्यामध्ये high quality backlinks तयार करून, सोशल मीडियावर वेबसाइटचा प्रचार करून आणि ऑनलाइन मार्केटिंगचे काही इतर प्रकार करता येणे शक्य आहे.

ह्याचा उद्देश्य Search Engine च्या नजरेत Website चा अधिकार (Authority), प्रतिष्ठा (Reputation) व प्रासंगिकता (Relevance) वाढवणे हा होय. ह्यामुळे Search Engine अशा Website/Blog ची Ranking अजून वाढवतात व त्यामुळे जास्त Organic Traffic (Organic traffic म्हणजे निव्वळ Search Engine मधून आपल्या Blog वर येणारे Visitors) आपल्या Website/Blog वर येण्यास मदत होते.

ह्यात Backlink, Guest Blogging, Online Reviews, Paid Advertise इत्यादीचा समावेश होतो.

SEO in Marathi

Image by Gerd Altmann from Pixabay

Technical SEO

Technical SEO हे आपल्या ब्लॉग पोस्टला सर्वोत्तम करण्यासाठीचा पाया आहे . Technical Analysis मध्ये Page Speed increase करणे , site errors fix (निदान) करणे, Site mobile-friendly बनवणे, Site map बनवणे, Duplicate content टाळणे. इत्यादींचा समावेश होतो. ह्याबद्दल अधिक खोलात माहिती करून घेण्यासाठी एखाद्या अनुभवी Web Developer ची मदत आपण घेऊ शकता.

वाचकांनी इथे Keyword Cannibalization बद्दल वाचले तर त्यांचा अजून वेळ वाचू शकतो. Keyword Cannibalization म्हणजे एकाच Keyword वर एकापेक्षा जास्त Post लिहिणे. असे केल्याने आपल्या Website वरील कोणती Blog Post जास्त उपयोगी आहे हे Search Engine ठरवू शकत नाही. त्यामुळे आपल्या अशा Post, Rank होण्याऐवजी खूप तळाशी जातात.

हे Keyword Cannibalization माझ्या चांगले लक्षात राहण्याचे कारण म्हणजे एकदा मी पुस्तकांच्या समीक्षेसाठी २ किंवा ३ वेगवेगळे लेख लिहिले होते. पण तसे केल्याने माझी पहिली Post जी अगोदर चांगली Rank झाली होती ती पण Ranking मध्ये मागे फेकल्या गेली. कॅनिबालीझशन शब्दाचा मार्केटिंग च्या संदर्भात अर्थ पाहल्यास एखाद्या कंपनीच्या एका नवीन Product ने त्याच कंपनीच्या जुन्या Products ची विक्री कमी करणे असा होतो. Blogging मध्ये दोन्ही सारख्या Keyword च्या पोस्ट मध्ये स्पर्धा निर्माण होऊन दोन्ही ची Ranking कमी होत असावी.

सारखे Keywords असल्यास आपण Pillar Post चा उपयोग करू शकतो. Pillar Post एक Original आणि संक्षिप्त Post असते व त्या Post मधून संबंधित वेगवेगळ्या विषयावर Click करून इतर Posts वाचता येतात.

ब्लॉगिंग मध्ये नव्याने उतरणाऱ्या वाचकांना सुरुवातीला जरी Search Engine Optimization (SEO in Marathi) बद्दल असे नवीन शब्द गोंधळात टाकत असले तरी सरावाने ह्या सगळ्यांची सवय होते व आपले लिखाण अधिक परिणामकारक होत जाते.

SEO in Marathi ह्या लेखाबद्दल आपले काही प्रश्न असल्यास नक्की विचारा. तसेच ह्या लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया किंवा सूचना अवश्य द्या. Happy Blogging!

हे सुद्धा वाचा: ब्लॉग म्हणजे काय?

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *