Micro niche blog ideas
ब्लॉगिंग मध्ये niche हा शब्द ऐकण्यात येतो. Niche ह्या शब्दाचा अर्थ a place or position that’s particularly appropriate for someone or something, especially due to being very specific and different from others असा आहे.
आता ब्लॉगिंग साठी असा विषय प्रत्येकानुसार वेगवेगळा असू शकतो. शिवाय एखाद्या विषयावर जास्त खोलात जाऊन लिहिण्यासाठी त्या विषयावर लेखकाचे प्रभुत्व असणे जरुरी असते, अन्यथा मराठी भाषेतील असे अनेक ब्लॉग माझ्या वाचनात आले आहेत कि ज्यामध्ये साधे मराठी शब्द सुद्धा चुकीचे लिहिलेले आढळतात. व्याकरण आणि वाक्यरचना सुद्धा अशुद्ध असते. आपल्या लेखणीने भाषेचे सौन्दर्य वाढवणे हा लेखकाचा प्रयत्न असावा. असो. आता Micro Niche कडे वळूया.
जर ब्लॉग फूड रेसिपी वर असेल तर millet based food recipe हा micro niche म्हणता येईल.
जर तुम्ही एखाद्या स्पर्धात्मक उद्योगांमध्ये (विमा, वित्तीय सेवा) असाल, तर तुम्हाला त्या क्षेत्रातील मोठ्या खेळाडूंशी स्पर्धा करावी लागते. असे लोक नवनवीन तांत्रिक संसाधनांसह अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असतात. त्यापेक्षा कुणी असा एखादा विषय (Micro niche) निवडू शकतो कि तुलनेने ज्यात कमी स्पर्धा आहे आणि ज्यात व्यावसायिक संधी लवकर मिळू शकते.
micro niche blog ideas
Micro niche म्हणजे काय?
मायक्रो निच म्हणजे मोठ्या क्षेत्रातील खूप छोटा आणि विशिष्ट विभाग. यामध्ये एका विशिष्ट गटाच्या विशिष्ट गरजा किंवा समस्या सोडवण्यासाठी काम केले जाते.
उदाहरणार्थ, विम्याच्या क्षेत्रामध्ये विमा म्हणजे (Macro) niche तर आरोग्य विमा म्हणजे sub niche व वयोवृद्धांसाठी स्वस्त आरोग्य विमा योजना म्हणजे micro niche असे म्हणता येईल.
Micro niche निवडणे का महत्त्वाचे आहे?
Micro Niche निवडल्याने तुम्हाला पुढील फायदे होतात:
- कमी स्पर्धा: मोठ्या स्पर्धकांशी थेट स्पर्धा न करता तुम्ही तुमच्या विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित करू शकता.
- अधिक प्रभावी मार्केटिंग: तुमची सामग्री आणि जाहिराती विशिष्ट वाचकांसाठी (किंवा ग्राहकांसाठी) तयार असल्यामुळे ती जास्त प्रभावी ठरते.
- उत्पन्नवाढीच्या संधी: विशिष्ट गरजांसाठी लीड जनरेशन करणे जास्त फायदेशीर ठरते.
- कायम मागणी: विशिष्ट गरजांमुळे ग्राहकांची मागणी कायम राहते.
- तज्ज्ञ म्हणून ओळख: विशिष्ट niche वर सतत काम केल्यामुळे त्या क्षेत्रातील तुम्ही तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकता.
Macro or micro niche.. काय निवडावे?
तुमच्या उद्दिष्टांवर, आवडींवर आणि संसाधनांवर निवड अवलंबून आहे:
- Macro niche: जर तुम्हाला विविध प्रकारची सामग्री तयार करायची असेल आणि विस्तृत बाजारपेठेत स्पर्धा करायची तयारी असेल.
- Micro niche: जर तुम्हाला लहान गटासाठी त्वरित यश मिळवायचे असेल आणि विशिष्ट प्रेक्षकांशी जोडले जायचे असेल.
Micro niche blog ideas काही उदाहरणे
- Health and Fitness blog (Micro niche: Yoga, Protein foods for health)
- Insurance (Micro niche: Health Insurance, term insurance)
- Personal Finance (Micro niche: Mutual fund or more specifically index fund)
- Food (Micro niche: Millet based foods, Gluten free diet)
- Personallity Development (Books for personality development)
- Fashion (Winter wears for men)……….आपल्या आवडीनुसार हे यादी मोठी होत जाईल.
निष्कर्ष
Micro आणि Macro niche ह्यांचे आपापले आपले फायदे आणि मर्यादा आहेत. काही नवीन ब्लॉगरसाठी micro niche योग्य ठरतो, कारण त्यात लवकर प्रगती दिसते आणि वाचकांशी चांगले नाते तयार होते. परंतु ह्यासाठी ब्लॉगरच्या लेखणीत तशी ताकद हवी. सुरुवातीला काम करताना काही नवीन ब्लॉगर macro niche वापरून दीर्घकालीन यशासाठी लागणारे कौशल्य विकसित करू शकतो.
पण सगळ्यात महत्वाचे वाटणारे म्हणजे ब्लॉगर ने स्वतःच्या आवडी आणि प्रेक्षकांच्या गरजांचा विचार करून निच निवडला तर यशाची जास्त शक्यता असते. Micro niche वर काम करणे म्हणजे ग्राहकांशी थेट संवाद साधणे होय. तुमच्या blog post व जाहिराती जितक्या विशिष्ट असतील, तितके तुम्हाला कमी खर्चात जास्त परिणाम दिसतील.