Positive quotes in marathi
Positive quotes in marathi म्हणजेच मराठी प्रेरणादायी सुविचार. रोजच्या जीवनात आपले काम करत असताना आपल्याला नेहमीच प्रेरणेची आणि सकारात्मक विचारांची गरज असते, जेणेकरून आपली कार्यक्षमता वाढत राहील. वाचा काही Positive quotes in marathi.
positive quotes in marathi
Positive quotes in marathi मराठी प्रेरणादायी सुविचार जर नियमित आपल्या कानावर पडत राहले तर कालांतराने नक्कीच एक जाणवणारा फरक कळतो. वाचाल तर वाचाल किंवा पुस्तके हेच आपले खरे मित्र असे जे काही सुविचार आपण शालेय जीवनात वाचले त्यामागे हाच उद्देश असावा असे वाटते.
वाचा माझ्या वाचनात आलेले असेच काही सुविचार..
Positive quotes in marathi
- आधी केले मग सांगितले: एखादी गोष्ट करून दाखवण्याआधी सगळ्यांना सांगत सुटणे हे हुशार मनुष्याच्या स्वभावात नसते. आपली योजना पूर्ण करण्याच्या आधीच जगाला सांगत सुटल्याने त्यात काही व्यत्यय आला तर लोक ह्या गोष्टीला हसण्यावारी नेण्याची शक्यता असते. शिवाय काही जणांकडून आपल्या योजनेत विघ्न आणण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
- जर तुमच्याकडे पुढील सहा महिन्यांची योजना नसेल तर तुम्ही दूरदर्शी नाही: आपल्याला पुढील काळात काय काम केल्याने स्व विकासात मदत होईल ह्याचा विचार करणे हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण होय.
- एखाद्या गोष्टीला वारंवार हिणवत राहले किंवा दोष देत राहले तर ती गोष्ट तुमच्याकडे येण्याची शक्यता कमीच राहते: आपल्याजवळ एखादी गोष्ट नसली म्हणजे ती चांगली नाही असे म्हणणे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबटच असे म्हटले तरी चालेल। त्यामुळे चांगल्या गोष्टींच्या , गुणांच्या बाबतीत सकारात्मक विचार ठेवले तर अश्या गोष्टी, गुण त्या व्यक्तीमध्ये सुद्धा रुजतात. जे लोक पैशाला वाईट म्हणतात त्यांचेकडे क्वचितच पैसे साठवून असतात.
- मी उद्या काय नवीन शिकू शकतो हा विचार करणारा व्यक्ती नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतो: असा व्यक्ती लोकांवर चर्चा करत राहण्यापेक्षा एखाद्या योजनेवर चर्चा करतो आणि कालांतराने आपले लक्ष्य सुद्धा गाठतो. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक मनुष्याकडून कोणता ना कोणता गुण शिकता येऊ शकतो.
- माझ्याकडे वेळ नाही आहे हा बहाणा अकार्यक्षम व्यक्तीसाठी आहे: यशस्वी लोकांनासुद्धा दिवसाच्या सुरुवातीला २४ तासच वेळ मिळतो फक्त ते त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करतात. बहाणा करणारे व्यक्ती थोडा थोडा वेळ व्यर्थ गोष्टीत गमावतात आणि वेळ नसल्याचा आव आणतात.
- एखाद्याचे भविष्य जर माहित करून घ्यावयाचे असेल तर तो आपला जास्तीचा वेळ आणि जास्तीचे पैसे कोठे खर्च करतो हे बघा, त्याचे भविष्य समजून येईल: युद्धाची तयारी करण्याचा सर्वोत्तम वेळ तो असतो जेव्हा युद्ध सुरु नसते ह्याच उक्तीप्रमाणे आपल्यात कौशल्य निर्माण करण्याचा सर्वोत्तम वेळ तो असतो जेव्हा त्या कौशल्याची त्वरित गरज नसते। आपला शिल्लकचा वेळ आणि शिल्लकचे धन अशा प्रकारे वापरावे कि त्याच्या प्रत्येक अंशाने जास्तीत जास्त मोबदला मिळण्याची शक्यता राहील.
- विद्या आणि धन क्षणोक्षणी कणाकणाने मिळवावी: फुरसतीच्या वेळात काहीतरी शिकत राहून एखादे कौशल्य शिकून घेणे आणि पैशाच्या बचतीतून आणि गुंतवणुकीतून थोडे थोडे पैसे गाठीला जमवणे हे एकाच दिवशी सगळे शिकून घेण्यापेक्षा जास्त योग्य आहे.
- अहंकार हाच तुमचा खरा शत्रू आहे: कमी अधिक प्रमाणात अहंकार हा सगळ्यांच्याच ठिकाणी आढळतो. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एखाद्याचा अहंकार त्याला नवीन काही गोष्टी शिकण्यासाठी किंवा मान्य करण्यासाठी विरोध करतो. अहंकार बाजूला ठेवून जर एखादी गोष्ट ऐकली तर कदाचित काही नवीन ज्ञानाची प्राप्ती होऊ शकेल.
- गर्दीच्या ठिकाणी नेहमी यश असेलच असे नाही: घासलेले रस्ते तुम्हाला नवीन ठिकाणी नेऊ शकत नाहीत. जर तुम्हाला नवीन गोष्टींची प्राप्ती करण्याची असेल तर नवीन मार्ग निवडावे लागतील. प्रारंभी काही अडचण येईल पण विश्वासाने प्रयत्न केले कि यश मिळण्याची शक्यता वाढीस लागते.
- स्वतःत गुंतवणूक करा: भविष्यात अनेक पटीने यश मिळवायचे असेल तर आज स्वतःत गुंतवणूक करणे सगळ्यात मोठी गुंतवणूक होय. भविष्यात यशासाठी जरुरी असलेले गुण आणि कौशल्य आज शिकून घेतले कि येणाऱ्या काळात फायदाच होईल हे सांगायला नको.
Positive quotes in marathi
Positive quotes in marathi किंवा मराठी प्रेरणादायी सुविचार अनेक प्रकारचे असू शकतात आणि अनेक व्यक्तीकडून आपण ते शिकू शकतो.
व्यक्तिमत्वाला झळाळी येण्यासाठी अशा प्रेरणादायी वाक्यांचे मनन आणि चिंतन फार जरुरी असते. positive quotes in marathi म्हणजे मराठी प्रेरणादायी सुविचार च्या वाचनाने आपल्यात सकारात्मक बदल निर्माण होतात. तर अशा Positive quotes in marathi चे वाचन आणि चिंतन करा आणि आपल्यात नवी ऊर्जा भरू द्या.
हे सुद्धा वाचा: “क” जीवनसत्वाचे फायदे