Good habits in marathi सवय लावावी नेटकी

Good habits in marathi

Good habits in marathi चांगल्या सवयी अधिक परिणाम

माणूस म्हणे सवयीने घडतो.. कि सवय माणसाला घडवते ? दोन्ही मध्ये एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे व्यक्तिमत्वाला अधिक शक्तिशाली बनवण्याची.

सवयीचे शास्त्र जरा विचित्रच म्हणावे लागेल. आपल्याला काय सवय आहे? हे जर कुणी विचारले तर क्षणभर विचारच करावा लागेल.

मला वाटते सवय माणसाला घडवते. हुशार मनुष्य स्वतःहून काही चांगल्या सवयी लावून घेतो. त्याला चांगल्या प्रकारे माहित असते कि चांगल्या सवयी ह्या त्याच्या उज्वल भविष्यासाठी फार महत्वाच्या असतात. अशा काही चांगल्या सवयी काय आहेत हे बघूया.

चांगल्या सवयी Good habits म्हणजे आपल्या नकळत किंवा मुद्दामहून केलेल्या अशा काही कृती कि ज्यांनी आपले काम सोप्या पद्धतीने पार पडते आणि अधिक परिणाम देते.

Good habits in marathi चांगल्या सवयी अधिक परिणाम

सवय म्हणजे अशी कृती जी आपल्याला नेहमी लक्षात ठेवण्याची गरज नसते. ती आपण नकळत करतो आणि मग ही सवय तिच्या ताकदीनुसार आपल्याला फळ देते.

एका हिंदी चित्रपटात नायक प्रशिक्षण घेण्यासाठी युद्धकलेत निपुण असलेल्या प्रशिक्षकाकडे जातो. त्यावेळेस प्रशिक्षण सुरु असताना प्रशिक्षक नायकाला म्हणतो कि तुझ्या फक्त एकदा सराव केलेल्या दहा हजार युद्धकलेमुळे मला काही भीती वाटत नाही पण दहा हजार वेळा सराव केलेल्या एका युद्धकलेमुळे मला भीती वाटेल.

एकच खोलवर रुजलेली सवय किती परिणामकारक असते हेच ह्यावरून सिद्ध होते.

चांगल्या सवयी स्वतःत रुजवण्याआधी कुणाला आपल्या सध्याच्या सवयी काय आहेत? ह्याचे निरीक्षण करावे लागेल. ह्यासाठी मला आवडलेला एक सोपा उपाय आहे.

सकाळी उठल्यानंतर आपण प्रत्येक तासात काय करतो ह्याचे काही दिवस निरीक्षण करा. हा आपला अभ्यास आहे असे समजा.

एक-दोन दिवसातच आपल्याला आपण दिवसाच्या वेगवेगळ्या भागात कसे कसे वागतो?, आपला वेळ कुठे जास्त जातो?, आपण रचनात्मक काम कधी करतो? कि करतच नाही?, भविष्यातील लक्ष्य गाठण्यासाठी आपण आजचा काही वेळ राखीव ठेवतो कि नाही? ह्याची माहिती होईल.

स्वतःच्या विकासासाठी प्रत्येकच जण जागृत असतो ह्यात काही शंका नाही फक्त काही लोकांजवळच त्यासाठी एक कृती योजना असते. आता आपण आपल्यासाठी एक Action plan बनवायचा. सोपा आणि लक्ष्य गाठण्यासाठी हा Action plan असावा ही अट आहे. त्यासाठी एका वेळेस एकाच सवयीवर काम केले तरी चालेल फक्त त्यात निरंतर सुधारणा झालीच पाहिजे हा हट्ट ठेवायचा.

पहिली पायरी First step

Good habits in marathi चांगल्या सवयी अधिक परिणाम

आपला प्रत्येक दिवस काही प्रमाणात तरी स्वतःसाठी उपयोगी झाला पाहिजे. त्यासाठी आपण सकाळी २ तास लवकर उठू शकतो. २ तास सुरुवातीला जरा जास्तच वाटेल.. हो ना? म्हणून अगोदर फक्त अर्धा तास आधी उठता येईल. अर्थात ह्यासाठी अगोदर रात्री लवकर झोपण्याची सवय लागेल. कोण एवढे उपद्व्याप करेल? असे वाटणे साहजिक आहे आणि शेवटी लवकर उठून तरी काय करायचे? असला मजेदार (आणि अर्थपूर्ण) प्रश्न काही जण तरी विचारतीलच. पण एकदा का सकाळच्या वेळेचा उपयोग करण्याची आपल्याला सवय लागली कि मग अनेक फायदे दिसून येतात (लेखक रोज किती वाजता उठतो? असे प्रश्न कृपया इथे विचारू नये 😊 )

ह्या वेळेत आपण शरीरासाठी व्यायाम करू शकतो आणि बुध्दीसाठी पुस्तके वाचू शकतो. एकदा व्यायाम केल्याने आपण भविष्यात निरोगी राहण्याचा फायदा घेत असतो. एकदा पुस्तक वाचल्याने आपण भविष्यातील कामांना अधिक कार्यक्षमतेने करत असतो. (विश्वास ठेवा- हे दोन्ही कामे लेखकाने सकाळच्या वेळेतच केलेले आहेत. एकदा तर लेखकाने प्रत्येक आठवड्यात जास्त पुस्तके कशी वाचायची? ह्यासाठी एक वर्ग लावला होता त्याची वेळच मुळी सकाळी ६ वाजताची होती. दुसऱ्यांदा योगासने प्राणायाम शिकण्यासाठी एक वर्ग लावला त्याची वेळ सकाळी ५ वाजतापासून सुरु व्हायची.)

हे करण्याचा हेतू एकच. दिवसाच्या सुरुवातीच्या वेळेत जास्त ऊर्जा भरली असते. ह्याचा उपयोग आपण स्वतःला दिवसभरासाठी तयार करण्यात लावायचा.

good habits in marathi

नंतरच्या तासांत पौष्टिक आहार किंवा शरीराला उपयोगी असे खाद्यपदार्थ खावे. ह्याचा दुसरा अर्थ असा आहे कि शरीराला नुकसान होईल असा आहार टाळावा. ह्यासाठी आपण एका आठवड्यात काय काय खायचे ह्याची एक सूची बनवू शकतो. ह्या सूचीत खोबरे, तीळ, जवस, मुबलक उपलब्ध असलेली फळे, काही सुका मेवा, भिजवलेल्या धान्याच्या उसळी, आंबवलेले पदार्थाचे व्यंजन वगैरे वगैरे समाविष्ट करू शकतो. लेखकाचा एक आवडीचा विषय खाणे – म्हणजे काहीबाही खाणे हा नसून आरोग्यासाठी सहायक असे खाणे – हा सुद्धा आहे.

Carbohydrate, Protein, Fat, Vitamins, Minerals, Water अशा विवरणानुसार रोजचे जरी झाले नाही तरी ३-४ दिवसांत आपल्या खाण्याला मार्गावर आणता येईल. आहारशास्त्राची बरीच पुस्तके लेखकाच्या वाचनात आली आहेत त्यानुसार आहार योग्य असेल तर किरकोळ व कधी कधी गंभीर स्वरूपाचे आजार सुद्धा नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात असे वाटते (प्रत्येकाच्या आरोग्यानुसार कमी अधिक निकाल मिळत असावा ). इथे एक वाक्य प्रकर्षाने आठवते “आजाराचा अभ्यास बरेच लोक करतात पण आरोग्याचा अभ्यास कमी लोक करतात.”

कार्यालयीन कामाच्या वेळेस मध्ये मध्ये स्वतःला उर्जावान ठेवण्यासाठी सकारात्मक शब्दांचे उपयोग करावे. जे लोक आपला बहुमूल्य वेळ वाया गमावतात त्यांचे हेतू ओळखून हेतुपुरस्सर त्यांच्यापासून दूर राहावे. तेवढ्या वेळेत आपण आपली एखादी योजना बनवू शकतो किंवा एखादे काम पूर्ण करू शकतो. ह्यासाठी खिशात एक छोटी डायरी ठेवता येईल. (वेळ वाया गमावणे हे सुद्धा एक सवय असते कि जी दीर्घ काळानंतर काही जण स्वतःला नकळत लावून घेतात. जर अशी सवय आपल्यात सुद्धा असेल तर ह्यावर एका विशेष योजनेद्वारे तीन आठवड्यात मात करता येईल.)

Good habits in marathi चांगल्या सवयी अधिक परिणाम

कामाच्या ठिकाणी बस किंवा आगगाडीने रोजची ये जा असेल तर प्रवासात मागील काही काळात आपण काय केले त्याची मीमांसा आणि पुढील काही काळात काय करायचे याची कार्ययोजना मनात घोळवता येईल.

संध्याकाळच्या वेळेत कुणी परत शरीरासाठी व्यायाम किंवा मनासाठी संगीत किंवा वाचन करू शकतो. (हे सुद्धा लेखकाने स्वतः करून अनुभवले आहे.)

झोपण्याआधी (अर्धा-एक तास अगोदर) दुसऱ्या दिवसाची किंवा पुढील ३-४ दिवसांची योजना मनात घोळवता येईल. झोपतांना मात्र दिवसाच्या सगळ्या घटनांना विसरून शांत झोप घ्यावी. भूतकाळातील घटनेचा व गेलेल्या वेळेचा काही उपयोग नसतो; उलट त्या गोष्टींचा विचार केल्याने वर्तमानातील वेळ व भविष्यातील वेळ दोन्ही मात्र आपल्या हातातून जातात. झोपत असतांना त्या दिवसाच्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी भूतकाळ असतात. संध्याकाळच्या व्यायामाने झोपेसाठी फायदाच होईल.

महिन्यासाठी एखादे छोटे लक्ष्य ठरवता येईल आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या क्षेत्रातील एखाद्या योग्य व्यक्तीची सेवा घेता येईल. त्यासाठी अशा व्यक्तींना त्यांची फी देता येईल. असे करणे म्हणजे आपले एक काम कमी करणे होय. ह्या वेळेचा उपयोग आपण आपल्या दुसऱ्या लक्ष्यासाठी करू शकतो.

दिवसभरातून काही वेळ एकदम रिक्त राहावे. त्यावेळेस शून्य राहून आजूबाजूच्या स्थितीचे, लोकांचे निरीक्षण करावे म्हणजे लोक कशात व्यस्त आहेत आणि कसे? ह्याचा मजेदार पण खूप उपयोगी असा अभ्यास होतो.

सवयींवर अधिक वाचण्यात जर आपल्याला रस असेल तर एका इतर मराठी ब्लॉग वरील खालील लेख आपल्याला आवडून जातील.

Mini Habits Book in Marathi

The compound effect book review in marathi

हे सुद्धा वाचा: मराठी प्रेरणादायी सुविचार



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *