My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक

माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi म्हणून कोणत्या एका पुस्तकाचे नाव घेता येणार नाही असंख्य पुस्तकांपैकी कित्येक पुस्तके मला आवडतात. नुकतेच वाचलेले The One Thing in marathi ह्या पुस्तकाचा हा सारांश..

My favorite book essay in marathi

आवडते पुस्तक म्हटले कि आपल्याला त्या पुस्तकातील काही भाग जास्त आवडतो किंवा त्या पुस्तकाच्या वाचनाने आपल्यात काही चांगल्या सवयी रुजतात. खऱ्या वाचकाला आपल्या पुस्तक संग्रहातील अनेक पुस्तके आवडतात कारण वेगवेगळ्या विषयावरील पुस्तकांमध्ये वेगवेगळे विषय मांडलेले असतात. व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी असलेल्या माझे आवडते पुस्तक My favorite book essay in marathi ह्या शीर्षकाखाली आपण The one thing ह्या पुस्तकाची चर्चा करूया.

आपल्या कामाचे जास्त परिणाम कसे मिळवावे ?

आपल्या सगळ्यांकडे एका दिवसाचे २४ तास असतात. मग का काही लोक रोजचे काम रोज पूर्ण करतात? आणि काही लोकांजवळ आज सुद्धा कालचे काम प्रलंबित असते आणि आजचे काम ते उद्यावर पण नेतात? काही लोकांना खूप काम करूनही पाहिजे तसे निकाल का मिळत नाहीत आणि काही लोक कमी काम करूनही यशस्वी का होतात?

अशा प्रश्नांची उत्तरे गॅरी केलर च्या My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक One Thing in marathi ह्या पुस्तकात मिळतात.

१) डॉमिनो इफेक्ट समजून घ्या.

लाकडाचे छोटे डॉमिनो जेव्हा आपण एका रांगेत लावतो तेव्हा पहिला पडणारा डॉमिनो दुसऱ्या डॉमिनो ला पाडतो आणि दुसरा तिसऱ्याला. एक २ इंचाचा डॉमिनो आपल्यापेक्षा ५० टक्के मोठा डॉमिनो पाडू शकतो आणि जर अशा क्रमाने पाहिले तर १८ वा पडणारा डॉमिनो हा पिसाच्या झुकत्या मनोऱ्याच्या (Leaning Tower of Pisa) उंचीचा असू शकतो आणि २३ व्या डॉमिनोची उंची पॅरिस च्या आयफिल टॉवर एवढी असू शकते.

ह्याचाच उपयोग करून आपण आपले लक्ष्य ठरवू शकतो. म्हणजे आजचे केलेले छोटे काम उद्या जास्त परिणाम देते. जर आपल्याला एका वर्षात ३६५ पानांचे पुस्तक लिहायचे असेल तर एका दिवशी एक पान लिहावे लागेल आणि एका तासात एक किंवा २ पॅराग्राफ.

एखाद्या व्यावसायिकाला जर अरबपती व्हायचे असेल तर त्याला अगोदर करोडपती व्हावे लागेल आणि त्याही अगोदर त्याला लखपती व्हावे लागेल आणि लखपती होण्यासाठी त्याला काही हजार रुपये जमवावे लागतील. म्हणजेच पुढच्या वर्षांची लक्ष्ये पूर्ण करण्यासाठी त्याला आज छोटे काही तरी काम करावे लागेल.

२) मल्टी टास्किंग खोटी गोष्ट आहे.
जर एखादा शिकारी एकाच वेळेस दोन ससे पकडण्याचा प्रयत्न करेल तर काय निकाल येईल ? एकही ससा मिळणार नाही. एकाच वेळेस दोन रस्ते बदलत राहाल तर काही मिळणार नाही.

ह्याऐवजी आपला वेळ आणि विचार एका गोष्टीवर लावा ते जास्त निकाल देईल. ह्यासाठी Time Block करणे तुम्ही शिकू शकता. Time block करणे म्हणजे एखाद्या महत्वाच्या कामासाठी वेळ काढणे .

त्या वेळेत बाकी कमी महत्वाची कामे पूर्ण बंद. आणि बघा खरे महत्वाचे काम कसे पार पडते ते. महत्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच दुसरे कमी महत्वाचे काम हातात घ्या आणि त्याला सुद्धा Time block करून पूर्ण करा.

३) मनुष्याजवळ इच्छाशक्ती सीमित असते.
मनुष्याची इच्छाशक्ती मोबाईल फोनच्या बॅटरी सारखी असते. तिला रोज चार्ज करावी लागते. प्रत्येकच मनुष्याला निसर्गतःच रोज एक ऊर्जा मिळते.

ही ऊर्जा सकाळी जास्त असते आणि दिवसभर नंतर कमी कमी होत जाते. म्हणून आपल्याला महत्वाचे काम सकाळीच पार पडणे शिकले पाहिजे.

सकाळच्या वेळेत कमी महत्वाची कामे बाजूला सारा आणि खऱ्या महत्वाच्या कामावर काम करणे शिका. दुसऱ्या दिवशी इच्छाशक्ती परत मिळते.

जास्त इच्छाशक्ती साठवण्यासाठी आपण आपल्या डोक्यात यशस्वी लोकांच्या गोष्टी शिरवून आपली इच्छाशक्ती वारंवार चार्ज करू शकतो.

४) आपली To Do लिस्ट बनवा.
Pareto चा ८०-२० नियम तुम्हाला माहित असेलच. ह्या नियमाप्रमाणे आपल्या एकूण कामाच्या फक्त २० टक्के कामाने आपल्याला अपेक्षित परिणामाच्या ८० टक्के परिणाम मिळतात आणि ह्याउलट आपण केलेल्या ८० टक्के कामांनी आपल्याला फक्त २० टक्के परिणाम मिळतात.

ह्याचा अर्थ असा कि आपल्या To Do list मध्ये रोज अशी कामे असली पाहिजेत कि ज्या कामांमुळे आपल्याला हवे असलेले निकाल मिळतील. ह्याउलट आपल्या लिस्ट मध्ये कमी महत्वाची कामे सगळ्यात खाली असावी.

तर आपल्यासाठी Focusing Question..
आपली One Thing काय की जी केल्याने बाकी गोष्टी सोप्या होतील किंवा त्या करण्याची गरजच राहणार नाही? आपल्या One Thing साठी आजच कार्य करणे सुरु करा.

My favorite book essay in marathi माझे आवडते पुस्तक म्हणून आपण कोणते पुस्तक सुचवाल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *