Marathi blog writing- ब्लॉग म्हणजे काय?

Marathi blog writing किंवा ब्लॉग म्हणजे काय? ह्या लेखात आपण खालील काही शीर्षकांखाली ब्लॉगिंग बद्दल माहिती जाणून घेऊ.

Marathi blog writing – ब्लॉग म्हणजे काय?

ब्लॉग म्हणजे काय? हा प्रश्न आपल्यालाही पडला असेल तर हा खास लेख आपल्यासाठीच आहे. ब्लॉग म्हणजे a website containing a writer’s own experiences, opinions etc असा अर्थ इंटरनेटवर दिसतो. ब्लॉग ह्या शब्दाशी माझी ओळख जवळपास २००९ -१० ला झाली असावी.

तेव्हा मी इंटरनेट वर काही गोष्टींच्या शोधात असलो कि बरेचदा त्या विषयाशी निगडित ब्लॉगला जरूर भेट द्यायचो आणि त्यासाठी असे कोणते ब्लॉग आहेत ह्यासाठी इंटरनेटवर शोधत असायचो.

Marathi blog writing

ब्लॉग म्हणजे एखाद्या विषयावर माहितगार व्यक्तीने लिहिलेले सविस्तर लेख असलेली एखादी वेबसाईट.

बऱ्याच वेबसाईट वर काही माहिती लिहिलेली असते जी वेळेनुसार क्वचितच बदलली जाते. ह्याउलट ब्लॉग म्हणजे अशी वेबसाईट कि ज्यावर थोड्या थोड्या काळाने नवीन माहितीपूर्ण लेख लिहिले जातात.

एखाद्या विषयात माहितगार व्यक्ती किंवा एखादा छंद असलेला व्यक्ती जेव्हा आपल्या आवडीच्या विषयाबद्दल नियमित अंतराने काही तरी लिखाण करतो किंवा आपले मत लिहितो तेव्हा तो त्या विषयावर ब्लॉगिंग करतो असे आपण म्हणू शकतो.

अशा सर्व आवडी जोपासणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आवडत्या विषयावर काहीतरी नक्कीच लिहिले पाहिजे म्हणजे त्यांच्या अनुभवाचा फायदा इतर वाचकांना होईल. म्हणतात ना, दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.

Marathi blog writing

What is blogging in Marathi? ब्लॉगिंग म्हणजे काय?

एखाद्या ब्लॉगला संचालित करणे जसे कि नवीन blog post लिहिणे, त्या ब्लॉगचा प्रसार करणे, वाचकांच्या प्रतिक्रियांना उत्तरे देणे म्हणजे ब्लॉगिंग.

Marathi blog writing

ब्लॉगिंग करणाऱ्या व्यक्तीला Blogger ब्लॉगर असे संबोधतात. ब्लॉगर म्हणजे एक किंवा कधी कधी अनेक लोकांचा समूह कि जो असे लेख लिहितो.

सोप्या शब्दात ब्लॉगिंग म्हणजे लेखन. फरक एवढाच कि फक्त छापील पुस्तकात न लिहिता इंटरनेटच्या साहाय्याने online platform वर आपल्या पसंतीचे लेख लिहिणे.

marathi blog writing

How to start blog in Marathi? स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा ?

आपले लिखाण इंटरनेटवर लिहिण्यासाठी आणि ते वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक blogging platform उपलब्ध आहेत. WordPress, Tumblr, Blogger, Medium, Drupal असे काही नावे आपल्याला माहित असतीलच. Marathiblogger हा ब्लॉग WordPress द्वारे संचालित आहे.

मी सुरुवातीला google च्या blogger वर फ्री अकाउंट उघडून काही लेख लिहिले होते. त्यात आवड निर्माण झाल्यानंतर मग custom domain व hosting घेऊन त्यावर WordPress वर्डप्रेस द्वारे लेख लिहिण्यास सुरुवात केली.

Marathi blog writing- ब्लॉगिंग बद्दल वाचतांना डोमेन आणि होस्टिंग हे शब्द जोडीने येतातच. Domain म्हणजे आपल्या आवडीचे वेबसाईटचे नाव. जसे कि आपल्या marathi blogger ह्या ब्लॉगसाठी मी marathiblogger.com हे नाव नोंदवले आहे. त्यासाठी दरवर्षी काही शुल्क भरावे लागते.

Hosting म्हणजे ह्या वेबसाईटला सतत ऑनलाईन ठेवण्यासाठी काही सेवा देणाऱ्या कंपनीकडे ही वेबसाईट जोडणे. त्यासाठी सुद्धा दरवर्षी काही शुल्क भरावे लागते.

स्वतःची वेगळी website न करता Domain व Hosting चा खर्च वाचू शकतो. पण जर का कुणी पुढे व्यावसायिक स्वरूपात लिखाण करू इच्छित असेल तर त्यांनी स्वतःच्या वेगळ्या website चा विचार करणे श्रेयस्कर ठरते.

जसे कि Google च्या blogger चा उपयोग करून ब्लॉग तयार केल्यास मात्र आपल्याला काही शुल्क द्यावे लागत नाही. फक्त आपल्या पसंतीचे domain name च्या शेवटी .com, .in, .net असे न राहता .blogspot.com असे राहते. म्हणजे थोडक्यात जर अशा website ने पुढे भविष्यात कधी ही लिखाण सुविधा बंद केली तर आपले लिखाण वाचकांपर्यंत पोहोचणार नाही.

Marathi blog writing

How to choose topic for blogging in Marathi? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणता विषय निवडावा?

ब्लॉग लिहिण्यासाठी कोणता विषय निवडावा? ह्याचे उत्तर काही सगळ्यांसाठी सारखेच नसेल. आपल्या आवडीनुसार ब्लॉगचा विषय निवडल्यास त्यात आपण अजून चांगले लिखाण करू शकतो किंवा आपण निवडलेल्या नवीन विषयात आपली आवड निर्माण करून त्या संबंधित माहितीपूर्ण लेख लिहिण्याचा प्रयत्न असायला हवा.

मी ब्लॉग लिहिण्यास सुरुवात ह्यासाठी केली होती की माझे इंग्रजी आणि हिंदी भाषेतील वाचन मराठी भाषेत लिहिण्याचा माझा मानस होता. वाचनासोबतच लिहिण्याची देखील मला आवड आहे.

आपल्या मराठी ब्लॉग साठी आपण खालील प्रकारे काही विषय Topics for marathi blog निवडू शकतो.

marathi blog writing
  • प्रवासवर्णन ब्लॉग Travelling blog
  • आरोग्य ब्लॉग Health blog
  • कथा कविता ब्लॉग Story and poem blog
  • विज्ञान ब्लॉग Science blog
  • पुस्तक समीक्षा ब्लॉग Book review blog
  • खाद्यपदार्थ बनवण्यासाठी ब्लॉग Food Recipe blog
  • अजून काही आवडीनुसार असलेले ब्लॉग. ह्यामध्ये काही नियम नाही तुम्हाला जो विषय आवडतो त्यात तुम्ही लेखन करू शकता. एक समर्पित विषय नसेल तरीही संमिश्र लेख असलेला एखादा ब्लॉग आपण आपल्या स्वतःच्या नावाने सुद्धा (स्वतःचे नाव असलेली वेबसाईट) प्रसिद्ध करू शकतो.

How to earn money using blogging in Marathi? ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवावे?

ह्या प्रश्नाकडे अनेक जणांचा विशेष कल असतो. ब्लॉगिंग बद्दल जे लिखाण आणि You tube videos इंटरनेट वर उपलब्ध आहेत त्यापैकी बऱ्याच सामग्रीचा कल पैसे कमावण्यासाठी ब्लॉगिंग कसे करावे? ह्याकडे जाणवतो.

असे लिखाण वाचल्यानंतर ब्लॉग म्हणजे पैसे कमावण्यासाठीच असा समज निर्माण होतो, पण लिहिणे हे लिहिण्यासाठी असले की ते वाचकांना जास्त आनंद देत असावे असे वाटते. फक्त पैशांसाठी काम न करता आपल्या आवडीचे काम देखील केले पाहिजे ह्याबद्दल The Almanack of Naval Ravikant ह्या एका पुस्तकाचे वाचन मला आवडून गेले. ह्या पुस्तकाची मराठी भाषेत लिहिलेली समीक्षा हौशी वाचक पैसामंत्र नावाच्या Marathi Investment Blog वर The Almanack of Naval Ravikant summary इथे वाचू शकतात.

असो. ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमावता येतील? ह्यासाठी खालील काही गोष्टींवर कार्य करता येईल.

  • Advertising
  • Affiliate Marketing
  • Selling of digital/physical products or services
  • Sponsored blog posts
  • Paid Reviews वगैरे वगैरे…

Advertising च्या माध्यमातून मराठी ब्लॉगिंग मधून पैसे येण्यासाठी आपल्याला Google AdSense चे Approval असावे लागते. ह्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या ब्लॉगवर दर्जेदार लिखाण असणे जरुरी आहे. Google AdSense चे approval मिळण्यासाठी अगोदर आपल्या ब्लॉगवर चांगली visitor traffic असायला हवी. ब्लॉगवर दिसणाऱ्या जाहिरातीवर कुणी click केले कि थोडे पैसे आपल्या AdSense Account मध्ये जमा होतात.

Affiliate Marketing द्वारे सुद्धा ब्लॉगवरून पैसे कमावता येतील. ह्यामध्ये आपण शिफारस केलेल्या वस्तू किंवा सेवा जर कुणी आपल्या blog द्वारे खरेदी केल्यास काही रक्कम कमिशन स्वरूपात लेखकाला मिळते. अजूनही काही प्रकारांनी कमाई होऊ शकते. ह्या सगळ्यात आपल्या ब्लॉगला किती लोक भेट देतात आणि त्यापैकी किती जण ती वस्तू किंवा सेवा खरेदी करतात हा महत्वाचा भाग असतो.

मी अगोदर BlogSpot वर AdSense मिळावे म्हणून प्रयत्न केला होता, पण त्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागली आणि तुमचा ब्लॉग अजून पात्र नाही असे मला दिसत असे. सुरवातीला आपला ब्लॉग किती लोक भेट देतात ह्या सांख्यिकी नुसार हे Approval मिळत असते.

ब्लॉगस्पॉट वर Blog सुरु केल्यानंतर चार पाच महिन्यातच मी एक अजून domain name घेऊन त्यावर वर्डप्रेस वेबसाईट बनवली. WordPress website सुद्धा मी काही videos पाहून स्वतःच बनवली होती. सुरुवातीलाच जास्त खर्च न करता नवीन इच्छुक blogger स्वतःची वेबसाईट बनवू शकतात.

Hosting कोणती घ्यावी ह्यात मात्र माझा गोंधळ होता. एका मित्राने सांगितल्याप्रमाणे मग मी एक जास्त महाग नसणारी Hosting घेतली. Hosting Premium Plan घेऊन जवळपास अडीच-तीन हजार वार्षिक शुल्कात मला त्यात पाच वेबसाईट जोडण्याची सुविधा मिळाली. एका website साठी अंदाजे 1200-1300 रुपयात मी पहिली होस्टिंग घेतली होती. त्यातच बदल करून मग मी प्रीमियम प्लॅन घेतला.

माझ्या एका .com च्या वेबसाईटला प्रथम AdSense मिळाले होते. त्यावर बऱ्याच देशांतून visitor traffic असते. त्यामानाने माझ्या एका इतर मराठी ब्लॉग वर (.in) उशिरा AdSense Approval मिळाले.

माझी पहिली दिसणारी कमाई होती 0.01 डॉलर म्हणजे आजचे अंदाजे ऐंशी पैसे. AdSense मधून खूप पैसे मिळण्यासाठी खूप Traffic असावी लागते. त्यातही त्यातील Ad वर किती Click होतात ह्यावरून ही कमाई ठरते. Click कोणत्या देशांतून होतात ह्यावर सुद्धा earning ठरत असते.

मी फक्त Organic visitor वरच विसंबून असल्यामुळे मी blog posts लिहिण्यावर भर दिला आणि ह्या सगळ्या प्रवासात मला blogging बद्दल बऱ्याच गोष्टी समजत गेल्या.

दर्जेदार ब्लॉग बनवण्यात आणि त्याला नियमित अद्ययावत ठेवण्यात वेळ हा लागतोच. त्यामुळे उगीच कुणी सुचवते म्हणून ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करू इच्छिणारे हौशी लेखक ह्या सगळ्या गोष्टींवर पुनर्विचार करू शकतात.

नव्याने जोडलेली काही माहिती (ऑक्टोबर २०२४): ब्लॉग hack होतो तेव्हा..

ह्या लेखाबद्दल आपली प्रतिक्रिया किंवा सूचना अवश्य द्या. Happy Blogging!

आपल्या ब्लॉगला internet वर rank करण्यासाठी Search Engine Optimization कसे करावे? ह्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी वाचा: SEO म्हणजे काय?

6 Comments

  1. खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • आपण उत्तम प्रकारे समजावले आहे.
      तसंही मराठी ब्लॉगवर वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे कमाई साठी येणाऱ्यांनी येथून थोडसं लांब राहणं बरं..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *