vitamin c in marathi
Vitamin C in marathi
आहार आणि आरोग्य “क जीवनसत्वाच्या गोष्टी” Vitamin c benefits
Vitamin C in marathi. Health is Wealth हे कथन काही आपल्याला नवीन नाही. आरोग्यात कधी काही नुकसान झाले तर ते खिशाला सुद्धा नुकसान पोहोचवते म्हणून काही जण ह्या म्हणीला ओळखत असतील किंवा खरी संपत्ती म्हणजे आरोग्यच असे काही जण समजत असतील.
आहार आणि आरोग्य ह्याचा फार निगडित संबंध आहे हे बऱ्याच लोकांचे मत आहे. बऱ्याच ह्यासाठी म्हटले कि आज नवीन नवीन शोधाचा संदर्भ देऊन फक्त खाण्यावर आरोग्य अवलंबून नाही असे मत नोंदविणारे सुद्धा असतीलच. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजेच जीवनसत्वे आणि खनिजे ह्यांचा आहारात समावेश असला पाहिजे हे सगळ्यांनाच माहित आहे. शरीराच्या वेगवेगळ्या क्रियेत त्यांचे महत्व असते. असे काही संदर्भ शोध स्वरूपात उपलब्ध आहेत आणि कित्येक अजून कदाचित भविष्यात उपलब्ध होतील.
अशाच जीवनसत्वांमधील एक अत्यंत ओळखीचे जीवनसत्व म्हणजे क जीवनसत्व. Vitamin C in marathi. व्हिटॅमिन C म्हणजेच ‘क’ जीवनसत्व आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. फक्त असलेल्या माहितीचा उपयोग आपण किती करतो हा ज्याचा त्याचा भाग असतो.
प्राथमिक शाळेत चौरस आहार असलेली थाळी सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात दाखवली असायची त्यावेळेस त्यावर फार काही मंथन झाले नाही. यथावकाश आहार, आरोग्य, व्यायाम जीवनसत्वे, खनिजे, अमिनो ऍसिडस् ह्याच्यावरील काही पुस्तके वाचण्यात आली आणि माझ्या आवडत्या विषयांपैकी एक असलेल्या नुट्रीशन ह्यात जास्त वाचण्याची इच्छा परत जागृत झाली.
Vitamin C in marathi
‘क’ जीवनसत्वावर बरेच वाचनात येत असले तरी जास्त खोलात गेलेले लेख एका जागी सापडणे कठीणच. म्हणून ह्या लेखाचा प्रपंच सुचला. लेखक व्यवसायाने डॉक्टर नसून पूरक औषधी वगैरे ह्या क्षेत्रात सुद्धा कार्यरत नाही. तेव्हा सदर लेख फक्त एक माहिती म्हणून वाचावा. जास्त कुतूहल असणाऱ्यांनी ह्या संदर्भावर असलेले वैज्ञानिक लिखाण वाचावे.
लेख लांब होण्याच्या भीतीपोटी शेवटी हे सगळे संदर्भ लेख देऊ शकलो नाही. ह्यात दिलेली माहिती ही मी खातरजमा करून घेतलेली नाही. फक्त संदर्भ वाचून लिहिलेली आहे, तेव्हा ह्याचा उपयोग करण्याआधी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Vitamin C in marathi. व्हिटॅमिन C च्या शोधाचा इतिहास विस्मयकारक आहे. १९३२ साली ‘क’ जीवनसत्व वेगळे काढल्या गेले परंतु त्याही अगोदर सतराव्या शतकापासून जगातील काही भागात हे माहित व्हायला सुरुवात झाली होती कि लिंबूवर्गीय फळांमध्ये असे काही तत्व आहे कि ज्याने स्कर्व्ही रोग बरा होतो. समुद्र प्रवासातील खलाशी स्कर्व्ही रोगाने ग्रसित व्हायचे परंतु वाचलेले खलाशी जेव्हा किनाऱ्यावर लागायचे तेव्हा ताजा भाजीपाला आणि फळे आहारात आल्यावर स्कर्व्ही चे लक्षणे दिसेनाशी होत असत.
१७४७ मध्ये ब्रिटीश नौदलातील जेम्स लिंड नावाच्या स्कॉटिश सर्जन ने जहाजावरील खलाशांवर काही प्रयोग करून हे दाखवून दिले. जेम्स लिंड हा काही ह्याचा पहिला शोधक नव्हता परंतु त्याने पहिली योजनाबद्ध clinical trial स्कर्वी आणि लिंबूवर्गीय फळांवर नोंदवली होती.
Vitamin C in marathi
समुद्रप्रवासातील जहांजांवरील १२ खलाशी ज्यांना स्कर्वीची लागण झाली होती त्यांना जेम्स ने २-२ च्या सहा समूहात विभागले. सगळ्या समूहांना सारखाच आहार दिला गेला पण पाचव्या समूहाला जेम्स ने जेवणासोबत दोन संत्री आणि एक निंबू दिले. सहा दिवसांनी फळं संपल्यामुळे ह्या पूरक आहाराला थांबवल्या गेले. पण तोपर्यंत दोन पैकी एक खलाशी कामावर रुजू झाला होता आणि दुसरा जवळपास पूर्णतः बरा झाला होता.
ह्या प्रयोगाची नोंद नंतर जेम्स लिंड ने १७५३ मध्ये प्रकाशित केले पण त्याला फार गांभीर्याने घेतल्या गेले नाही. काही साध्या वाटणाऱ्या गोष्टी परिणामकारक असतात असे आजही अनेक जण त्वरित कबूल करत नसल्याचे उदाहरणे आपल्याला आज रोजी सुद्धा आढळत असतीलच.
Vitamin C in marathi
नंतर १७५८ साली जेव्हा जेम्स लिंड ब्रिटिश नौदलाचा मुख्य चिकित्सक नियुक्त झाला तेव्हा समुद्रप्रवासातील जहाजांवर वेगवेळ्या प्रमाणाच्या लिंबूवर्गीय फळांपासून बनलेल्या द्रव्यांचा साठा दिला गेला आणि मग १७६२ मध्ये Lind’s Essay on the most effectual means of preserving the health of seamen प्रसिद्ध केल्या गेला.
ही सगळी लांबच लांब कथा सांगण्याचा उद्देश एकच कि वरकरणी कमी महत्वाची वाटणारी गोष्ट सुद्धा फार महत्वाची असू शकते हा संदेश ह्या गोष्टीतून घेता येतो. शिवाय आपण आपल्या परीने सुद्धा अशा प्रकारच्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचे संशोधनपर वृत्तीने निरीक्षण करू शकतो.
The Clinical Impact of Vitamin C: My Personal Experiences as a physician ह्या आपल्या लेखात Thomas E Levy ह्यांनी काही उदाहरणे दिली आहेत कि ज्यामध्ये क जीवनसत्वाच्या औषधांनी काही प्रकारच्या रोगांमध्ये रुग्णाच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली होती.
Vitamin C in marathi
Thomas E Levy म्हणतात कि क जीवनसत्व आरोग्य आणि उपचारासाठी निसर्गाची एक अमूल्य भेट आहे. बऱ्याच प्रकारचे रोग ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होऊ शकतात आणि ‘क’ जीवनसत्व व अजून काही अँटी ऑक्सिडंट अशा प्रकारच्या ऑक्सिडेटिव्ह तणावाला दूर किंवा काही अंशी कमी करू शकतात.
Vitamin c benefits in marathi
काही संशोधनांती हे सिद्ध झाले आहे कि जास्त ‘क’ जीवनसत्व घेतल्याने रक्तातील अँटिऑक्सिडंट ची पातळी जवळपास ३० टक्क्यांनी वाढते. वाढलेला रक्तदाब कमी करण्यात सुद्धा ‘क’ जीवनसत्वाची भूमिका आढळून येते. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात क जीवनसत्व दिल्याने रक्तवाहिन्या शिथिल होऊन वाढलेला रक्तदाब कमी झालेला आढळला.
याव्यतिरिक्त, 29 मानवी अभ्यासाच्या विश्लेषणामध्ये असे आढळले आहे की व्हिटॅमिन सी पूरक आहार घेतल्यास सिस्टोलिक रक्तदाब (वरील नोंद ) 3.8 मिमी एचजी ने कमी झाला आणि डायस्टोलिक रक्तदाब (खालील नोंद ) 1.5 ने कमी झालेला आढळला.
Vitamin C in marathi
कोलेस्टेरॉल वाढलेल्या अवस्थेत सुद्धा ‘क’ जीवनसत्वाचा उपयोग केल्याची उदाहरणे आहेत. माकडांना ‘क’ जीवनसत्व विरहित आहार दिल्याने त्यांच्या शरीरात सामान्य माकडांपेक्षा सहापट कोलेस्टेरॉल तयार झाले. अथेरोस्कॅलॅरॉसिस मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये हे कोलेस्टेरॉल साठल्याने रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन त्या कठीण बनतात.
‘क’ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात दिल्याने त्यांचा कडकपणा जाऊन हळूहळू कोलेस्टेरॉल कमी झाले. ‘क’ जीवनसत्व घेतल्याने शरीरात लोह अवशोषण वाढल्याचे संदर्भ काही अभ्यासात नोंदवले आहेत.सर्दी पडसे किंवा साधारण संसर्ग ह्यामध्ये सुद्धा ‘क’ जीवनसत्वाचा फायदा झाल्याचे काही ठिकाणी लिखाण आहे.
Vitamin C in marathi
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल नुट्रीशन मधील एका शोधपत्रात लिहिलेले आहे कि ज्या व्यक्तींच्या रक्तात ‘क’ जीवनसत्वाची पातळी जास्त असते त्यांना हृदयरोगाची शक्यता ४२ टक्क्यांनी कमी असल्याचे आढळून आले . ह्यामागील कारण नक्की विशद केलेले नाही. ह्या संशोधनाला भलेही सगळ्यांनी दुजोरा दिला नसेल तरीही असे संशोधन लेख प्रस्थापित मतांच्या विरुद्ध दिशा दाखवितात.
Vitamin c benefits on skin
ह्याच शोधपत्रिकेत ४० ते ७४ वर्ष वयाच्या ४०२५ महिलांवर अभ्यास करून जास्त ‘क’ जीवनसत्वामुळे त्वचेवर कमी सुरकुत्या, कमी कोरडेपणा आणि त्वचेचे वय चांगले दिसते असा निष्कर्ष देणारा सुद्धा एक लेख प्रसिद्ध केलेला आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सुद्धा ‘क’ जीवनसत्वाची महत्वाची भूमिका दिसते.
व्हिटॅमिन सी लिम्फोसाइट्स आणि फागोसाइट्स नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादनास उत्तेजन देण्यास मदत करते, जे शरीरास संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करते. शिवाय फ्री रॅडिकल पासून शरीराचे रक्षण करण्यास पांढऱ्या पेशींच्या कामात मदत करते.
Other benefits of vitamin c
काही अभ्यासमंध्ये ‘क’ जीवनसत्वाच्या आधाराने जखम लवकर भरून येण्यास मदत होते असा सुद्धा निष्कर्ष काढला आहे. ह्याशिवाय काही दावे असे सुद्धा आहेत कि ज्यामध्ये ‘क’ जीवनसत्वाचा उपयोग कॅन्सर, डोळ्यांचे आरोग्य ह्यामध्ये लिहिलेला दिसतो पण ह्यामध्ये पुरेसे मानवी नमुने नोंदवलेले नाहीत.
Fruits for vitamin c – source of vitamin c
Vitamin C in marathi. आवळा, लिंबू, संत्रा, स्ट्राबेरी अशा फळामध्ये ‘क’ जीवनसत्व विपुल प्रमाणात मिळते. शेवटी काय तर आहारातील अनेक घटक आपल्या आपल्या परीने मानवी शरीराला फायदे पोहोचवत असतात. काही निरीक्षक वृत्तीचे लोक ह्यावर लक्ष ठेवून त्याचा फायदा करून घेतात.
‘क’ जीवनसत्वाच्या अशा अनेक मनोरंजक गोष्टींनी इंटरनेट भरलेले आहे. हा लेख आपल्या संशोधन दृष्टीला चालना देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून लिहिला आहे.
Vitamin C in marathi.